जननी आशिष...
डोंबिवली (प.) कडील हेंद्र्या कॉम्पलेक्स मधील आम्ही मित्रांनी एकत्र येऊन शनिवार दिनांक 19/11/2016 रोजी डोंबिवली पूर्व येथील " जननी आशिष चॅरीटेबल ट्रस्टला" मुलांसोबत भेट देऊन ट्रस्ट मधील 0 ते 6 वयोगटातील मुलांना आवश्यक गरजेच्या वस्तु आणि खाऊंचे वाटप केले तसेच ट्रस्ट मधील मुलांसोबत वेळ घालवला आणि त्यांच्यासोबत खेळही खेळले.
छोट्या छोट्या मुलांना पाहून सगळेच जण हळवे झाले होते.
यासाठी रमेश खुर्दड, संजय परदेशी, जयेश माधव, नितीन पवार, आशिष जाधव,समीर कुबल,सुरेश सावंत,दिलीप पाटील,अमोल जेठे विणा भाभी आणि प्राची सावंत मॅडम या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.
जननी आशिष चॅरीटेबल ट्स्टविषयी थोडेसे....
समाजातील अनाथ मुलांच्या पालन पोषणाच्या गरजेमधून 1989 साली डॉ.किर्तीदा प्रधान यांच्या प्रेरणेतून डोंबिवलीतील 21 महीलांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली. 0ते 6 वर्षांच्या अनाथ निराधार मुलांचे पालन पोषण आणि प्रमाने जपणूक या संस्थेत केले जाते. आई वडीलांच्या प्रेमाला पारखी झालेल्या या मुलांना प्रेमाच्या पंखाखाली वाढवले जाते. बहुतांश मुले ही पोलीसांनी आणुन दिलेली आहेत. वाट चुकलेली, आई वडिलांनी टाकलेली तसेच पोलीसांनी सोडवून आणलेली आहेत. अनाथ असणे म्हणजे काय हे आपल्याला अशा मुलांना बघीतल्यावर जाणवते. आपण त्यांच्याशी खेळायला गेलो तर ती लगेच आपल्यातील होऊन जातात. आपल्या मुलांना आपण जगातली सगळी सुखे देण्यासाठी आपल्या जीवाचा आटापीटा करत असतो मग या अशा आई वडीलांचे कृपा छत्र गमावलेल्या मुलांसाठी त्यांना हवं ते कोण देणार..? आपण घरात जेव्हा आपल्या मुलांचा विचार करतो तेव्हा मनाच्या एका कोपऱ्यात या मुलांसाठी थोडीशी जागा ठेवायला नको का..? आपल्या छोट्या मुलांसोबत ही मुले एकरूप होऊन जातात. मुलं ही या देशाचं भविष्य आहेत मग या अनाथ मुलांचे भविष्य काय..? आपण ररस्त्यावर , रेल्वे स्टेशनवर आणि बर्याच ठिकाणी लहान लहान मुले भिक मागताना बघतो आपण आपल्या मुलांचे जबाबदार पालक म्हणून घेतो मग या भिक मागणार्या मुलांना पाहून आपल्या मनात काहीच चलबिचल होत नाही का..? पेपरमध्ये आपण नेहमीच वाचत असतो, नवजात अर्भक गटारात सापडले किंवा कचर्याच्या कुंडीत सापडले तेव्हा आपले मन चर्र होत नाही का..? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात आणि निघूनही जातात पण या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला " जननी आशिष" मध्ये मिळतात. 1989 साली डॉ. किर्तीदा प्रधान यांच्या प्रेरणेतून डोंबिवलीतील 21 महिलांनी एकत्र येऊन वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचे प्रयत्न केले आणि " जननी आशिष चॅरीटेबल ट्रस्टची" निर्मिती झाली. अनाथ निराधार बालकांची माय बनून त्यांचे संगोपन करणे त्यांना माया आणि प्रेम देणे तसेच या मुलांना सुयोग्य जोडप्यांच्या स्वाधिन करून त्यांना समाजात सन्मान, सुरक्षितता व स्थिरता मिळवून देणे ही उद्यीष्टे डोळ्यासमोर ठेऊन संस्थेच्या कामास सुरूवात झाली. कुठल्याही सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतः ची कमाई याकामी लावली गेली आणि एक एक बाळ आपलेसे करण्यास सुरूवात झाली. आत्ता पर्यंत जवळपास 550 मुले या संस्थत दाखल करून घेतली गेली आणि जवळपास 425 एवढ्या मुलांना हक्काचे घर आणि आई वडील मिळवून दिले. मुलांच्या संगोपनासाठी प्रशिक्षीत जबाबदार कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग , नर्स, आया मावश्या,आणि कायदेशीर बाजू सांभाळण्या करीता वकिल अहोरात्र झटत असतात. समाजातील चांगूलपणा वर विश्वास ठेवून ही संस्था चालविली जाते. समजातील अनेक लोक आर्थिक ,वस्तूरूपाने तसेच कपडे, धान्य, गरजेच्या आवश्यक वस्तु देऊन मदतीचा हात देत असतात. मुख्य म्हणजे डोंबिवलीतील सर्व डॉक्टर्स मोफत वैद्यकीय सेवा देत असतात. विशेष नजरेत येणारी गोष्ट म्हणजे संस्थेच्या गेट बाहेर एक छान आेटा बनवून त्यावर एक पाळणे ठेवले आहे.हे पाळणे बरेच काही शिकवून जाते.संवेदनशिन मनाला हे पाळणे पाहून गहीवरून येते. दत्तक प्रक्रिये मधील किचकट तरतुदींमुळे बर्याच वेळा मुलांना पालक मिळण्यास वेळ जातो हे खरे असले तरी संस्थेचे प्रयत्न अविरत चालूच असतात.
--✍जयेश अ. माधव